Log In

 
Company : CommonFloor.com 
Tuesday, February 24, 2015 5:11PM IST (11:41AM GMT)
 
‘कॉमनफ्लोअर’ ने रिअल इस्टेटमधल्या ग्राहकांसाठी सादर केली व्हर्च्युअल रिअॅलिटी
ग्राहकांना कुठेही, केव्हाही प्रॉपर्टीज पाहता याव्यात यासाठी लाँच केलं ‘कॉमनफ्लोअर रेटिना’
 
Mumbai, Maharashtra, India

कॉमनफ्लोअर डॉट कॉम या भारतातल्या आघाडीच्या ऑनलाइन रिअल इस्टेट व्यासपीठाने सर्वसामान्य ग्राहकांसाठी ‘कॉमनफ्लोअर रेटिना’ ही रिअल इस्टेट क्षेत्रातली जगातली पहिली व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रावर आधारित अभिनव संकल्पना सादर केली आहे. या क्रांतीकारी तंत्रज्ञानामुळे प्रॉपर्टी खरेदी करू इच्छिणाऱ्यांना ‘खऱ्या’ प्रॉपर्टीचा अनुभव घेता येईल ज्यामुळे त्यांना कोणत्याही वेळी कुठूनही एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीज पाहता येतील किंवा त्यांचं परीक्षण किंवा मूल्यमापन करता येईल.

रिअल इस्टेट जगतातल्या या भव्य तंत्रज्ञानाधिष्ठित अभिनव संकल्पनेच्या लाँचच्या वेळी बोलताना कॉमनफ्लोअर डॉट कॉमचे सहसंस्थापक आणि सीईओ सुमीत जैन म्हणाले, ‘आम्ही आधुनिक जगातली ऑनलाइन रिअल्टी क्षेत्रातली एक कंपनी असून तंत्रज्ञान आणि अभिनवता ही आमची मूलभूत अंगं आहेत. एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असल्यास ग्राहकाला त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो तसंच त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूकही करावी लागते. त्यामुळे आमचा नेहमीच प्रयत्न असतो की अशी साधनं आणि तंत्रज्ञान बनवावीत ज्यामुळे ग्राहकांना प्रॉपर्टीज शोधणं सोपं जाईल आणि त्यांना एकदम सुखासीन अनुभव मिळेल. या आमच्या ध्यासाचं एक फलित म्हणजे कॉमनफ्लोअर रेटिना. यामध्ये ग्राहकांचा फायदा साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्मार्ट फायदा करून घेण्यात आला आहे.’  

कॉमनफ्लोअर रेटिना’चं काम कसं चालतं?
आपल्या अॅण्ड्रॉइड फोनवर कॉमनफ्लोअर रेटिना अॅप्लिकेशन इन्स्टॉल करावं.
अॅप लाँच करावं आणि सीएफ रेटिना हेडगिअरखाली आपला फोन घालावा.
व्हर्च्युअल रिआलिटीच्या माध्यामातून प्रॉपर्टीजचा अनुभव घ्यावा.
कृपया अधिक माहितीसाठी www.commonfloor.com/retina ही वेबसाइट आणि व्हीडिओ यूआरएल्स पाहाव्यात.

कॉमनफ्लोअर डॉट कॉमचे सहसंस्थापक आणि सीटीओ ललित मंगल म्हणाले, ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी योजनाबद्ध गुंतवणूक करण्यास आम्ही प्राधान्य देतो. ही संकल्पना भारतात तसंच जागतिक पातळीवर रिअल इस्टेट क्षेत्रातली ‘गेम चेंजर’ गोष्ट ठरेल यात वादच नाही. यात अधिकाधिक प्रकल्प अंतर्भूत व्हावेत यासाठी आम्ही अनेक बिल्डर्सबरोबर काम करणार आहोत. त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक प्रॉपर्टीजच्या भेटीचा पर्याय उपलब्ध होईल.’

शोभा लिमिटेडचे व्हाइस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर जे.सी.शर्मा म्हणाले, ‘आपल्या ज्या प्रकारे प्रॉपर्टीजकडे पाहतो त्यात आमूलाग्र बदल आणण्याचं श्रेय कॉमनफ्लोअर डॉट कॉमला जातं. ‘कॉमनफ्लोअर रेटिना’ ही त्यांची नवी संकल्पना खरोखरचं प्रशंसनीय आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या या संकल्पनेमुळे ग्राहकांना घरी बसल्याबसल्या आरामात त्यांना हव्या असलेल्या प्रॉपर्टीजना आभासी भेट देता येईल. यामुळे त्यांना प्रॉपर्टीजचा अंतर्गत तसंच बाह्यभाग अत्यंत रंजक पद्धतीने पाहता येईल. शिवाय ज्यांना एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत त्यांचा वेळ विशेषत्वाने वाचेल.’

‘कॉमनफ्लोअर रेटिना’ वापरून एखाद्या प्रॉपर्टीची आभासी भेट घेण्यासाठी यूजरला हेडगिअरचा वापर करावा लागेल. यातून ग्राहकाला अविस्मरणीय अनुभव मिळतो आणि विशिष्ट प्रॉपर्टीतली जागा आणि भवताल याबरोबरच इतरही अनेक गोष्टींची साद्यंत माहिती मिळते.

हेडगिअरवरचा साधा चुंबक नेव्हिगेशन टूल म्हणून काम करतो. या अॅपमुळे बिल्डर्सना होणारा फायदा म्हणजे मॉडेल अपार्टमेण्ट बनवण्यासाठीचा त्यांचा खर्च आणि जागा वाचेल.
‘हे एक अत्यंत उपयुक्त उत्पादन असून त्यामुळे घर घेऊ इच्छिणारे ग्राहक इमारत आणि त्यातलं अपार्टमेण्ट यांचा चांगलाच अंदाज बांधू शकतील. खरेदी करण्यापूर्वी प्रत्यक्ष जाऊन प्रॉपर्टी पाहू न शकणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होईल. तसंच ज्यांनी अगोदरच घर विकत घेतलं आहे आणि ते नातेवाईक/मित्रमंडळींना दाखवायचा असेल तेव्हाही या अॅपचा बराच फायदा होईल,’ असं मत ब्रिगेड ग्रुपच्या मार्केटिंग विभागाच्या सीनि​अर डीजीएम व्योमा पंडित यांनी व्यक्त केलं.
 

 
तांत्रिक माहितीः पुढील अॅण्ड्रॉइड फोन्सवर हे अॅप चालतं
  • नेक्सस ४ आणि त्यापुढचे फोन
  • मोटो जी सेकण्ड जनरेशन
  • सॅमसंग गॅलेक्सी ४ आणि त्यापुढचे फोन
  • मोटोएक्स
  • एमआयथ्री
 
कॉमनफ्लोअर डॉट कॉमवर सर्वाधिक प्रॉपर्टीजची सूचीबद्ध असून त्यात २०० हून अधिक शहरातल्या १ लाखांहून अधिक निवासी प्रकल्प पाहायला मिळतात. या प्लॅटफॉर्मवर १० मिलियन घरं आधीच सूचिबद्ध झाली असून देशातलं प्रत्येक विक्रीयोग्य घर यात समाविष्ट व्हावं असा कंपनीचा प्रयत्न आहे. या कंपनीसाठी १००० हून अधिक कर्मचारी कार्यरत असून सर्वाधिक कुशल मनुष्यबळ आपल्याकडे कार्यरत असावं असा कंपनीचा प्रयत्न असतो.

कॉमनफ्लोअर डॉट कॉमबद्दल :

२००७ मध्ये सुमीत जैन, ललित मंगल आणि विकास मालपानी यांनी कॉमनफ्लोअर डॉट कॉमची स्थापना केली. हे भारतातलं एक आघाडीचं रिअल इस्टेट व्यासपीठ असून ते प्रॉपर्टी शोधणं, अपार्टमेण्टचं व्यवस्थापन आणि व्हेण्डर्सचं व्यवस्थापन पाहतं तसंच घरासंदर्भातल्या ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करतं.

कॉमनफ्लोअर डॉट कॉमच्या व्यासपीठावर, घराचा शोध घेण्यापासून अपार्टमेण्ट कम्युनिटीमधल्या इतरांशी संवाद घडवून आणण्यापर्यंत, एखाद्याला त्याला हवी असलेली सेवा पुरवणाऱ्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यापर्यंत घरासंदर्भातली प्रत्येक गरज पूर्ण केली ​जाते. २०० शहरांमधल्या ५ लाखांहून ​अधिक अॅक्टिव्ह प्रॉपर्टीज इथे सूचीबद्ध असून यात १ लाखाहून अधिक निवासी प्रकल्प सूचीबद्ध आहेत. कॉमनफ्लोअर डॉट कॉमला अॅसेल पार्टनर्स, टायगर ग्लोबल आणि गुगल कॅपिटलकडून अर्थसहाय्य मिळालं आहे.

कॉमनफ्लोअर डॉट कॉमबद्दल अधिक माहितीसाठी कृपया पुढील वेबसाइट पाहावी- www.commonfloor.com 

www.commonfloor.com/retina इथे भेट द्या आणि व्हीडिओ यूआरएल पाहा.

कॉमनफ्लोअर डॉट कॉमबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया संपर्क साधा-

परफेक्ट रिलेशन्स

सिंधू राजशेखरन।+ ९१ ९९१६१०३५३०। sindhur@perfectrelations.com
आकाश ठाकूर।+ ९१ ७७६०११८५०७। athakur@perfectrelations.com
 
कॉमनफ्लोअर डॉट कॉम
श्वेता मोहंती + ९१ ९८८६५२०१४१। sweta.mohanty@commonfloor.com
 

 
For News Release background on CommonFloor.com click here
 
 
 
Submit your press release
More News from CommonFloor.com

08/03/2018 1:00PM

CommonFloor Hosts Online Home Festival

CommonFloor, a leading online real estate platform for home buyers, sellers and real estate professionals will connect builders and consumers with virtual shopping festival starting from 7th March 2018.

16/10/2015 5:05PM

Flatchat goes International with Singapore Debut

Flatchat, the home rentals and roommate-finder app, is now launching in Singapore. Backed by CommonFloor.com—Flatchat is a mobile-based platform that helps students and bachelors find accommodation and flatmates. ...

28/08/2015 4:20PM

CommonFloor Launches New Business Division to Revamp its GTM Strategy

In its pursuit to solve problems for home buyers and real estate developers, and to go beyond marketing & sales to play the role of a technology partner, CommonFloor, India’s leading online real estate ...

Similar News

10/12/2018 6:39PM Image

RBL Bank’s Umeed 1000 Cyclothon Culminates in Bengaluru

Umeed 1000 Cycothon, a CSR initiative by RBL Bank, which was flagged off in Mumbai on 30th November, 2018, has culminated at Manipal Global Academy of BFSI campus in Thanisandra today.

No Image

10/12/2018 5:45PM

#StopMithani: After Donating 151 Times, Why This Man Must Be Stopped

HDFC Bank organised the 12th edition of its national Blood Donation Drive on 7th December 2018. To create awareness about this social initiative with a campaign #StopMithani.